क्षेत्रमाहात्म्य

श्रीमंत पेशवे यांची समाधी व सती वृंदावन

          थेऊर क्षेत्राला जे महत्त्व प्राप्त झाले आहे, तें रमा-माधव यांच्या म्हणजेच थोरले माधवराव पेशवे व त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्या सान्निध्यामुळे. श्रीमंत माधवराव पेशवे यांची श्रीचिंतामणीवर विलक्षण भक्ति होती व राज्यकारभाराच्या कामांतून वेळ मिळाला की ते मनःस्वास्थ्य आणि शरीरस्वास्थ्य साधण्याकरितां या ठिकाणी येऊन राहत. क्षयरोगाशी झगडत असतां त्यांच्या अखेरच्या दिवसांत त्यांनी श्रीचिंतामणीच्या सहवासांतच राहून शेवटी आपले प्राण देवाच्या चरणी सोडले, आणि त्यांच्या पत्नी  रमाबाईसाहेब पतीबरोबर तेथेंच सती गेल्या. त्या जागी आज सतीचें वृंदावन आहे. श्रीमंत माधवराव पेशवे श्रीचिंतामणी चरणी लीन झाल्यावर और्ध्वदेहिकाची तयारी होण्यापूर्वी त्यांचे पार्थिव ज्या जागी ठेवण्यात आले त्याच जागी आज देवस्थान ट्रस्ट तर्फे यांची पालखी ठेवलेली आहे. तेथे उभारलेल्या पेशवे दरबारात श्रीमंत माधवराव पेशवे यांचा अत्यंत आकर्षक पुतळा तसेच अत्यंत रेखीव भित्तिशिल्पे उभारण्यात आली आहेत.

theur-leave-img-divider
मराठी english