रजोगुणाच्या चंचलतापूर्ण कृतिशीलतेमुळे, सृष्टि निर्मितीच्या कार्यात व्यस्त झालेले ब्रह्मदेव अनेक विघ्नांद्वारे पीडिल्या गेल्यामुळे जीव देण्याची इच्छा करते झाले. त्यावेळी आपल्या घडलेल्या प्रमादाची जाणीव झाल्यामुळे सख्यभक्तीच्याद्वारे आपले आराध्य असणाऱ्या व सर्व गुणांच्या पार असणाऱ्या चित्तप्रकाशक चिंतामणीच्या उपासनेने चिंतामुक्त झाले. त्या भगवान ब्रह्मदेवांनी स्थावरक्षेत्री स्थापन केलेल्या, स्थिरबुद्धीचे सुख प्रदान करणाऱ्या श्रीचिंतामणींचे आम्ही स्तवन करतो.